विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं लोकयुक्त विधेयक नेमकं आहे तरी काय

307 0

 

केंद्र सरकारनं लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्याची अपेक्षा होती त्यानुसार लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. नेमका हे लोकायुक्त विधेयक काय आहे पाहूयात…

याच लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं तेव्हा त्यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आले होते या समितीत अण्णा हजारे आणि त्यांनी दिलेले प्रतिनिधी होते या समितीने जे बदल सुचवले ते सर्व बदल मान्य करण्यात आले असल्याचं देखील फडणवीसांनी विधानसभेत बोलताना सांगितलं

आता या लोकायुक्त कायद्याची कशी असेल रचना आणि नेमके काय असतील अधिकार हे पाहूयात

लोकायुक्त हे उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील. या लोकायुक्त समितीत पाच सदस्य असतील व त्यांच्या नेमणुका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती करतील

लोकायुक्तांना काय असणार अधिकार ?

★ येणाऱ्या तक्रारींचे अन्वेषण 24 तासांत होणार

★ चौकशीचे खटले विशेष न्यायालयाकडून एका वर्षाच्या आत निकाली काढण्यात येतील

★ लोकसेवकानं मालमत्ता भ्रष्टाचारी मार्गानं मिळवल्याचं कोर्टानं नोंदवल्यास ती जप्त किंवा सरकार जमा करण्याचे आदेश लोकायुक्त देऊ शकतात

★ महत्त्वाचं म्हणजे या खटल्याचा संपूर्ण खर्च आरोपींकडून केला जाणार वसूल

भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हा लोकायुक्त कायदा करण्यात आला असून आता या कायद्यानंतर तरी भ्रष्टाचाराला आळा बसणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल…..

Share This News

Related Post

Beed Accident

Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 23, 2023 0
बीड : बीडमध्ये (Beed Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्राच्या लग्नाला निघालेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला…
Cabinet Expansion

Cabinet expansion : अखेर खातेवाटप जाहीर; अजित पवारांना अर्थ खाते तर धनंजय मुंडेना कृषी खाते

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप…

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Posted by - December 6, 2022 0
           पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी मुंबई : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या…

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 10, 2022 0
पंढरपूर:इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्‌गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच…

सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *