ऐकावे ते नवलचं ! काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दुकानदारावर रोखली बंदूक, गोळी थेट…

300 0

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एक अजब घटना घडली आहे. खरंतर या प्रकरणातील अवघ्या 23 वर्षीय आरोपीकडे गावठी कट्टा असणे हि धक्कादायक गोष्ट आहे. परंतु या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सुरज मुंडे या 23 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोघे जण सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे असलेल्या फुल परी स्वीट मॉल या दुकानात गेले. तिथे त्यांनी एक किलो काजूकतली खरेदी केली. दुकानदाराने काजुकतलीचे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि थेट त्यांच्याजवळ असलेले पिस्तूल दुकानदारावर रोखले आणि चार राऊंड फायर देखील केले. नशिबाने त्यातून एकही गोळी फायर झाले नाही. त्यानंतर यातील प्रमुख आरोपीने हातातील पिस्तूल खाली घेऊन त्याचा ट्रिगर ओढला त्याबद्दल त्यातून एक गोळी खाली पडली.

या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. जमावाला पाहून या दोन्ही आरोपांनी तिथून पोबारा केला. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही मधील फुटेच्या आधारे हे पिस्तूल खरे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या आरोपींना ताब्यात घेतला आहे.

Share This News

Related Post

Vikhe And Pichad

पिचडांनानंतर आता विखे-पाटलांचा नंबर; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचे भाष्य

Posted by - May 17, 2023 0
अहमदनगर: विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या (Agasti Cooperative Sugar Factory) निवडणुकीत जातीने…
Sangli News

Sangli News : खळबळजनक ! सांगलीमध्ये स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न

Posted by - October 4, 2023 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) कडेगाव तालुक्यामधील वांगी गावात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच…

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

Posted by - January 17, 2023 0
पुणे : जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…

पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली  : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये…

Big Breaking ! औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव ! कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- ठाकरे सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी मिळाली आहे. शिवसेनेचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *