PUNE CRIME : पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांचं गोळीबारानं स्वागत! तिकडं पदभाराचा स्वीकार; इकडं वारज्यात गोळीबार ! थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद VIDEO

605 0

पुणे : इकडं पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि रात्री वारज्यातील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार झाला. या घटनेमुळं वारजे परिसरात एकच खळबळ उडालीये. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

कार्तिक इंगवले असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काल शुक्रवारी रात्री फिर्यादी योगेश चंद्रकांत डोळसे हा तरुण दुचाकीवरून त्याच्या घरी जात होता. त्याचवेळी कार्तिक इंगवले हा त्याच्या मित्रासह दुचाकीवरून रामनगरच्या दिशेनं जात होता. रामनगर येथील मारुती मंदिराजवळ आरोपी आणि फिर्यादी जवळ आले असता इंगवले यानं फिर्यादीकडं पाचशे रुपयांची मागणी केली.

त्यावर फिर्यादीनं माझ्याकडं पैसे नाहीत, असं सांगितलं. पैसे न दिल्यानं आरोपी इंगवले यानं पाठलाग करून रामनगर येथील वेताळबाबा चौकात योगेश डोळसेवर गोळी झाडली. सुदैवानं यात फिर्यादी थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर इंगवले यानं तिथून पळ काढला. या गोळीबारात तरुणासह रस्त्यावरून जाणारा एक अल्पवयीन मुलगा बचावला. याप्रकरणी योगेश चंद्रकांत डोळसे यानं वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. कार्तिक इंगवले हा सराईत गुन्हेगार असून तो नुकताच मोक्का कारवाईतून तुरुंगातून बाहेर आला आहे.

भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी ? सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम केलेल्या रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी ही गोळीबाराची घटना घडली. त्यामुळं या अशा सराईत गुंडांना वठणीवर आणण्याचं आव्हान रितेश कुमार यांच्यासमोर असणार आहे.

Share This News

Related Post

98 वर्षीय कैद्याची तुरुंगातून सुटका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “नेमका काय गुन्हा केला होता ?”

Posted by - January 9, 2023 0
अयोध्या : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला कारागृहातून मुक्त करण्यात येते आहे, असे…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय

Posted by - June 2, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नुकतेच विद्यापीठातर्फे श्री माळी यांनी या जागेचे…

पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन ; राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - October 6, 2022 0
पुणे : नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे…

संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती – छगन भुजबळ

Posted by - July 31, 2022 0
संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.छगन भुजबळ म्हणाले, राऊतांवर ही कारवाई अपेक्षित…
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Posted by - May 9, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *