पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

283 0

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आढावा घेतला आणि विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, सा. बां.विद्युत विभाग आदी विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला.

देशभरातील अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

#PUNE : नदीपात्रातील झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चढले झाडावर ; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Posted by - March 27, 2023 0
पुणे : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिकेने नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रवादी…
accident

Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला जोरदार धडक; मुलीच्या डोळ्यांदेखत आईने सोडला जीव

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर आज सकाळी टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे आईचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला तर मुलगी…

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपतची कारवाई; 1 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात VIDEO

Posted by - March 21, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक…

दुर्दैवी : इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटामध्ये 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - October 3, 2022 0
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक वापरकर्त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पसंती दर्शवण्यास सुरुवात केली होती. परंतु आत्तापर्यंत इलेक्ट्रिक…
Sharad Mohol

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - January 13, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *