मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव (व्हिडीओ)

141 0

PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून PMPML कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. वर्षानुवर्षे पुणेकरांची सेवा करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्ताधारी भाजपने केली नाही. सभागृहात चर्चा करूनही PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करणे याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. संपूर्ण शहर कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना PMPML कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र या कोरोना काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. यावर कळस म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या देश विकण्याच्या योजनेतून प्रेरणा घेत सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकाही विकायला काढली, PMPML च्या खासगीकरणाची चाचपणी सुरू केली. पुणे शहराच्या विकासात PMPML कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे असतानाही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. कोरोनाच्या काळात बसेस बंद असतानाही ठेकेदारांना तब्बल १६० कोटी रुपये देणारे सत्ताधारी भाजप कर्मचाऱ्यांच्या वेतानाच्यावेळी मात्र हात आखडता घेतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता.

एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, PMPML वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे. असे यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की येत्या ७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या अक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल. यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अश्वासन त्यांनी का कामगारांना दिले.
महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,सौ दिपाली ताई धुमाळ, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, प्रदीप देशमुख,सोमनाथ शिंदे,किरण थेऊरकर,सुनील नलावडे,राजेंद्र कोंडे,हरीश ओहोळ,कैलास पासलकर आदींसह PMPML युनियन चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या…

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या जीवास धोका – संजय राऊत

Posted by - July 5, 2022 0
पुणे: उदयपुर येथील घटनेचं लोण महाराष्ट्रात देखील पसरलं असून अमरावतीमध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे…

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखासह 6 जणांना अटक

Posted by - August 3, 2022 0
उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना…

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 26, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी…
Pune News

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Posted by - May 8, 2024 0
पुणे : सर्व दिशांना विकसित होणारे पुणे आता कॉस्मोपॉलिटन झाले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका आता मुंबईला मागे टाकून राज्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *