मोठी बातमी : CBI च्या मागणीनंतर अनिल देशमुख यांच्या जामीनाला दहा दिवसांची स्थगिती

299 0

मुंबई : भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. 13 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला होता. तथापि सीबीआयच्या मागणीनंतर या जामीनाला आता दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयने न्यायालयात विनंती करून देशमुख यांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता पुढचे दहा दिवस देशमुख यांचा मुक्काम पुन्हा तुरुंगातच असणार आहेत.

अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुख यांचे पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे या अटी लागू केल्या असून त्यामुळे पुढचे दहा दिवस अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Share This News

Related Post

Pune Bus Fire

पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग

Posted by - June 17, 2023 0
चाकण : गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे नाशिक महामार्गावर…

मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

Posted by - March 10, 2022 0
राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश,…

विरोधात असताना आम्ही कधीतरी राजभवनात शिष्टमंडळ घेऊन जात होतो, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Posted by - February 11, 2022 0
मुंबई- आम्ही विरोधी पक्षात असताना वर्षातून कधीतरी राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी येत असू. आमच्या व्यथा त्यांच्या कानावर घालत असू, असे…

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले  तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज…

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ! दिवसाआड होणारी पाणीकपात रद्द…

Posted by - July 22, 2022 0
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण पाणी पातळी पाहता महानगरपालिकेने १ जुलै रोजी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *