गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

186 0

गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या महिला उमेदवार म्हणजे संगीता पाटील.

गुजरातमधील भाजपच्या विद्यमान आमदार संगिता पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा लिंबायतची जागा राखत काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांचा पराभव केला. संगिता पाटील यांना 51363 तर काँग्रेसचे गोपाळ पाटील यांना 20018 मतं मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार पंकजभाई तायडे यांना 21718 मतं मिळाली. संगिता पाटील यांनी ही जागा 29645 मतांनी जिंकली. लिंबायत जागेसाठी पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं.

याआधी 2012 आणि 2017 मध्ये लिंबायतची जागा भाजपनं जिंकली होती. खानदेशच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक हे गाव म्हणजे आमदार संगीता पाटील यांचं माहेर. त्यांचे वडील डहाणू येथे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचा एक भाऊ पोलीस दलात आहे तर दुसरा भाऊ व्यवसाय करतो. पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रूक या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन बहिणी देखील आहेत. संगीता पाटील यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. गुजरात विधानसभेत आतापर्यंत त्या दोन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून गेल्या असून सुरतमधील लिंबायत मतदारसंघातून भाजपानं त्यांना यावेळी पुन्हा एकदा संधी दिली आणि त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली.

Share This News

Related Post

राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Posted by - October 3, 2022 0
मुंबई : ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही…

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Posted by - June 1, 2022 0
पुणे – राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती…

रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

Posted by - January 21, 2023 0
मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल…

जी-20 च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट; पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

Posted by - January 18, 2023 0
पुणे : जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. लाल महल…

मोठी बातमी : दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पुणेकरांना थांबा ! बाजारपेठा वाहतूक कोंडीने तुडुंब

Posted by - October 15, 2022 0
पुणे : दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले आहेत. भर बाजारपेठेमध्ये निमुळते रस्ते, त्यात नागरिकांनी चार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *