ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध

297 0

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोन पे गुगल पेसह एटीएम फसवणुकीच्या घटना देखील रोज घडतात. त्यामुळं एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी आणि एटीएम फ्रॉड कसं टाळावं जाणून घ्या.

एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की, तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तेथे कुणीही नसावे. इतर कोणी असल्यास, त्या व्यक्तीस बाहेर जाण्यास सांगा आणि संशय असल्यास, त्या एटीएममधून ताबडतोब बाहेर या.घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतो. असे करणे अल्पावधीत सोयीचे असू शकते, परंतु दीर्घकाळात तुमची फसवणूक होऊ शकते. अशी चूक करू नका. आजकाल अशा घटनाही समोर येत आहेत ज्यात जवळच्या लोकांनीच लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

काही कारणास्तव तुम्हाला एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.एटीएममधून पैसे काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे एका नजरेने पहा. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा कारण स्कॅमर कधीकधी एटीएममध्ये क्लोनिंग उपकरणे किंवा कार्ड रीडर चिप्स ठेऊ शकतात. हे उपकरण एटीएम कार्डचा डेटा चोरते यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडता. अशा परिस्थितीत जर काही शंका असेल तर ते एटीएम वापरू नका.तुम्ही तुमचा एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिल्यास तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते. यावर बँक तुम्हाला सल्लाही देते. तसेच, विशिष्ट पॅटर्न किंवा तत्सम संख्यांचा पिन बनवू नका. तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे अंक, 0000, 1111 सारखे अंक वापरू नका

या सोप्या टिप्स फॉलो करा. एटीएम वापरताना अशा चुका करणं टाळा. कुठलाही ऑनलाईन व्यवहार करताना विशेष काळजी घेण्यास विसरू नका.

Share This News

Related Post

ऐन दिवाळी ST प्रवाशांचं निघणार दिवाळं! 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान STची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

Posted by - October 15, 2022 0
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

Posted by - June 20, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

VINAYAK METE ACCIDENT : ड्रायव्हरला योग्य लोकेशन सांगता आले नाही ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; वाचा काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 22, 2022 0
मुंबई : 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघात झाला होता. या…

#BJP : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापचं असणार चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवार !

Posted by - February 4, 2023 0
चिंचवड : अखेर निर्णय झाला आहे. भाजपने चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची माळ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी…
Rajasthan News

Rajasthan News : चिमुकलीची भाऊबीज राहूनच गेली; भावासह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - November 14, 2023 0
जैसलमेर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला निघालेल्या (Rajasthan News) कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये कुटुंबातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *