पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

330 0

पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. शहरातील मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. नुकतीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पुणे मेट्रोच्या भुयारी मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या वतीने या ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर करून ही ट्रायल यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गाचे कामकाज 85% पूर्ण झाले आहे. जमिनीपासून 28 ते 30 मीटर खोल हा भुयारी मार्ग आहे. उर्वरित काम देखील प्रगतीपथावर असून ते देखील लवकरच पूर्ण होईल. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा एकूण 17 पूर्णांक 4 km चा हा मेट्रो मार्ग असून त्यापैकी स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग बनवून तयार झाला आहे.

Share This News

Related Post

गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील आश्रमात ओशो अनुयायांना प्रवेश नाकारला; अनुयायांचं आंदोलन

Posted by - July 14, 2022 0
पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त समाधीच्या दर्शनासाठी देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या ओशो अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई केल्याबद्दल पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर…

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे- अजित पवार

Posted by - March 26, 2022 0
पुणे- बदलत्या काळानुसार दिव्यांग बांधवांपुढील बदलणाऱ्या समस्या, अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पुणे येथे होणारे जिल्हा…

#HEALTH WEALTH : साखरेची पातळी अचानक कमी होते का ? या टिप्स ताबडतोब रक्तातील साखरेची पातळी वाढवतील

Posted by - March 24, 2023 0
काम करण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा अगदी सरळ विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या रक्तातील साखर म्हणजेच रक्तातील ग्लुकोजमधून ऊर्जा आणि ऊर्जा आवश्यक असते.…

प्रिय राज ठाकरे; खारघरच्या दुर्घटनेवरून सुषमा अंधारेंचं राज ठाकरे यांना खरमरीत पत्र म्हणाल्या…..

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे…
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Posted by - February 21, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *