“मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावात…!” आणि शरद पवार संतापले

222 0

बेळगाव : कर्नाटकमध्ये आज महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले करण्यात आले. दगडफेक आणि सातत्याने कर्नाटक सरकारकडून होणारे चितावणीखोर वक्तव्य पाहता सीमावाद आता चिघळला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, येत्या 24 तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर, संयमाला रस्ता पाहायला मिळेल. या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल हे चित्र घडत असताना दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधला म्हणाले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते असे ते म्हणाले.

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. गाड्या रोखल्या…. तसेच बेळगाव आणि इतर मराठी भाशीक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केलं जात असून, यामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचाही बांध फुटतोय. 23 नोव्हेंबरला जत संबंधित यांनी भूमिका मांडली. 24 नोव्हेंबरला अक्कलकोट बद्दल बोलले फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही अशी टीका देखील केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्टेटमेंट सातत्याने केली आहेत सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे.

देशाला ज्यांनी संविधान दिलं थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरूपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चितावणीखोर भूमिका घेतली जाते आहे. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धोका आहे हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघायची भूमिका घेऊन चालणार नाही असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

Breaking News ! २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे विमान बेपत्ता, विमानात ४ भारतीय प्रवासी

Posted by - May 29, 2022 0
काठमांडू- २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे तारा एअर विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या विमानाचा नियंत्रणकक्षाशी…

आफ्रिका : दोन बसचा भीषण अपघात; अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू; 87 जखमी, सेनेगल देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

Posted by - January 9, 2023 0
आफ्रिका : आफ्रिकेतील सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला तर 87 प्रवासी…

#SHAHRUKH KHAN : किंग खानच्या या घड्याळाच्या किमतीमध्ये सामान्य माणसाची ४ घरं बांधून होतील; किंमत वाचून अचंभित व्हाल !

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. जागतिक सांख्यिकी अहवालाने काही दिवसांपूर्वी ही माहिती जगाला दिली होती.…

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा;वाचा नेमके काय घडले…

Posted by - July 8, 2022 0
मध्यप्रदेश: अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा यासह आठ हजार पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा मध्य…

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

Posted by - May 5, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड.गुणरत्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *