पुणे विभागातील 400 एसटी बस ‘खिळखिळ्या’ ; लालपरीची स्थिती बिकट

133 0

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास सध्या खडतर स्थितीत सुरू आहे. राज्यातील १६ हजार एसटी बसेसपैकी ७ हजार बसेसची स्थिती अत्यंत वाईट असून त्या प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य बनल्या आहेत. यामध्ये पुणे विभागाची काय स्थिती आहे. पाहूया

पुणे विभागातील ८५० बसेसपैकी ४०० बस प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. या बसेस राज्य परिवहन महामंडळाला भंगारात काढायच्या आहेत, मात्र त्या जागी दुसऱ्या बसची उपलब्धता नसल्याने त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आहे.एसटीच्या अपघाताचे प्रमाण जरी कमी असले तरीही ब्रेक डाऊनच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील वाढत आहे. वर्षाकाठी ६० हजार एसटी बस ब्रेकडाऊन होत आहेत. एसटी बसची स्थिती खराब झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ वाया जाऊन गैरसोय देखील होते. डेपोतून निघताना या बसची कधी पाहणी होते, तर कधी नाही. या पार्श्वभुमीवर धोकादायक बसेस प्रवासी सेवेतून हटवणे गरजेचे आहे.

Share This News

Related Post

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत; नागपूरमध्ये प्राथमिक उपचार, स्वतः माहिती देताना म्हणाले कि, …

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज मॉर्निंग वॉकला गेले असताना दुखापत झाली आहे. थोरात यांच्या खांद्याला दुखापत…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

Posted by - February 4, 2022 0
नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या…
Khandve

पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाधीशांना धमकावल्या प्रकरणी अटक

Posted by - June 4, 2023 0
गडचिरोली : आपल्या विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोली…

संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ! किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला, वाचा काय आहे प्रकरण

Posted by - January 6, 2023 0
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला कोर्टात दाखल केला होता.…

सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, 24 तासांत 3 लाख नवीन कोरोनाबाधित

Posted by - January 24, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट कायम आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशी देशात दैनंदिन रुग्णवाढीत घट झाल्याचं आशादायक चित्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *