सांगली, सोलापूर पाठोपाठ नांदेडच्या सहा तालुक्यांना नकोसा झाला महाराष्ट्र !

365 0

नांदेड : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक वादातील वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांना महाराष्ट्र नकोसा झालाय. नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांची खदखद समोर आलीय.

नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचं आहे, अशी मागणी केली आहे.माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. त्यासाठी “प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे” ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय.नांदेड जिल्ह्यातले अनेक तालुके मागास आहेत.

तिथल्या लोकांना हव्या त्या सोयी-सुविधा मिळत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तेलंगणात मात्र परिस्थिती वेगळीय. तिथे मजूर, नोकरदार आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे राहते. मोफत वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे मिळतात. कृषीपंप, विहिरीच्या योजना आहेत. त्यामुळे तिकडे जीवन सुकर होईल, असे या भागातल्या नागरिकांना वाटू लागलंय.

एकूणच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार लवकरात लवकर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Share This News

Related Post

मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू; जाणून घ्या काय आहे भाडेदर

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. बेलापूर ते मुंबई अशी ही…
Beed Accident

Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 23, 2023 0
बीड : बीडमध्ये (Beed Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्राच्या लग्नाला निघालेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला…

“अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण…!”; मंत्री शंभुराज देसाईंची पवारांवर टीका

Posted by - December 31, 2022 0
सातारा : “संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा…!”, या वक्तव्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सत्ताधारांनी कडाडून टीका सुरू केली…

राज ठाकरेंचा पुणे दौरा; मनसेच्या गोटात तणाव; ‘त्या’ पत्रानंतर राज ठाकरे यांची कशी असणार भूमिका…

Posted by - December 27, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक सणसणीत पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. अर्थात नक्की…
Chhagan Bhujbal

OBC Melava : दोन महिन्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, छगन भुजबळांची मागणी

Posted by - November 26, 2023 0
हिंगोली : सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी (OBC Melava) असं वातावरण निर्माण झालं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *