ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

226 0

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तीन पुरस्कार ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज तर्फे अर्ज करण्याचे आवाहन

Posted by - March 17, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वोत्कृष्ट…

पुण्यात लग्न समारंभ आटोपला; घरी परतताना काळने घाला घातला; एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Posted by - March 27, 2023 0
लातूर : लातूरच्या चलबुर्गा पाटीजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा एक फोटो समोर आला असून या फोटोमधून अपघाताची…

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

Posted by - April 28, 2023 0
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान…

Gram Panchayat Election Results Updates : ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; पुण्यातील कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची आली सत्ता? वाचा सविस्तर

Posted by - December 20, 2022 0
महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमधील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार…

PHOTO : मंगलमय वातावरणात ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान

Posted by - August 31, 2022 0
पुणे : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *