…म्हणून शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली

536 0

शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेले प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सध्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर होती. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिस्तीने कारभार करत असताना आरोग्य संस्थांना अचानक भेट देणे, मुख्यालय न राहणाऱ्यांना वेतन कपात आणि घर भाडे कपातीच्या नोटिसा देणे, 24 तास ड्युटी, इंटरशिप करणाऱ्यांनाही ड्युटी करावी लागेल अशी सक्ती केली होती.

यामुळेच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा तुकाराम मुंढे यांना विरोध वाढू लागला होता. त्यानंतर आता आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून आदेशामध्ये लिहिले आहे की शासनाने आपली बदली केली असून आपण आपल्या आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा कार्यभार प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आलेल्या प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे आणि पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी असे म्हटले आहे.

ही बाब तुकाराम मुंडे यांच्या बाबत पहिल्यांदा घडत नाही आहे. आतापर्यंत त्यांच्या शिस्तप्रिय कामकाजामुळेच अनेक वेळा त्यांची बदली करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा याच त्यांच्या शिस्तीमुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Share This News

Related Post

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Posted by - February 19, 2023 0
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

#TRAILER : तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते आहेत का ? OTT वर येणार साऊथचे वादळ ! या आठवड्याची संपूर्ण यादी वाचाचं

Posted by - February 22, 2023 0
ओटीटीपासून थिएटर्सपर्यंत या आठवड्याला दाक्षिणात्य चित्रपटांचे नाव देण्यात येणार आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट २४…

JOB : तरुणांसाठी आनंदाची बातमी… दरमहा भरणार रोजगार मेळावा !

Posted by - January 7, 2023 0
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राइव्ह’ चे आयोजन करण्यात येणार आहे.…

सोलापुरातील तब्बल 28 गावं कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक; गावामध्ये बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असोच्या घोषणा !

Posted by - November 30, 2022 0
सोलापुर : सध्या सीमावाद हा महाराष्ट्राच सर्वात मोठा दुखणं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दिसून येत…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

Posted by - September 16, 2022 0
पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *