संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या संविधान दौडला मिळाला प्रचंड प्रतिसाद; 50 देशांचे 5 हजारहून अधिकजन धावले

452 0

पुणे : भारताच्या संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली.

https://youtu.be/us0Otomswao

यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) धर्मपाल गजभये, अविनाश महातेकर, कर्नल विजय कुमार, कर्नल मुखर्जी आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्रित संविधनातील उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी बॉम्बे आर्मी सॲपरच्या बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन केले.

या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवान तर आर्मीचे साठ जवान यात सहभागी झाले होते.

संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे – चंद्रकांत पाटील

भारताच्या संविधानाबाबत प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, लवकरच याबाबत नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक बदल करणार असून त्यामध्ये या सर्व आवश्यक बदलांचा समावेश असेल. इतक्या पहाटे सर्व नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत याचा मला आनंद वाटतो आहे असेही ते यावेळी म्हणाले.

संविधनाचा जीवनात अंगीकार करा – डॉ.कारभारी काळे

डॉ.कारभारी काळे म्हणाले, संविधनाने आपल्याला दिलेल्या ताकदीचे आकलन करून त्याचा उपयोग आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा. मात्र त्यासोबतच आपली कर्तव्ये विसरता कामा नये. संविधानाने आपल्याला जो विचार दिला आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाची ताकद ही जगभरात पोहोचली आहे.

अमिताभ गुप्ता म्हणाले, आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी संविधान अभ्यासतो, ही संविधानाची ताकद आहे. या दौडमध्ये सहभागी झालेल्यांना आपले शारीरिक स्वास्थ सुदृढ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी अनुक्रमे १०, ५ व ३ किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. या एकूणच कार्यक्रमाला आर्मी व सदर्न कमांडचे सहकार्य लाभले.

Share This News

Related Post

Crime

भोसरीत कोयता ‘गँग’चा दोघांवर हल्ला ; 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 3, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील दिघी रोडवर कोयता गँगनं एका तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची शनिवारी रात्री घडली. या…

MUNICIPAL ELECTIONS : प्रभाग रचनेच्या निर्णयावरून पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने… (VIDEO)

Posted by - August 4, 2022 0
पुणे : 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या…

बागेश्ववर बाबानं पुन्हा उधळली मुक्ताफळं; म्हणाले साईबाबा….

Posted by - April 2, 2023 0
नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले…

बाळूमामाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; आठ जण गंभीर जखमी

Posted by - March 5, 2023 0
बाळूमामा यांच्या पालखी तळावरून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन घेऊन घरी…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *