डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

340 0

पुणे : माजी नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव जयेश काळे यांनी काढले आहे. आज डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ (इंडिया) चे टेक्निकल हेड मार्क भस्मे यांनी नियुक्ती पत्र जाधव यांना दिले.

डान्स स्केट या खेळाचा स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (एस जी एफ आय ) च्या खेळांच्या यादीत समावेश झाला असून देशातील सर्व CBSC बोर्डाच्या १९ वर्षा पर्यतच्या शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा या खेळात समावेश असेल.

पुढील महिन्या पर्यंत (एस एस सी ) बोर्डाच्या सर्व मराठी शाळा कॉलेज मधील १९ वर्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या खेळाचा समावेश होईल. त्यात शहर आणि जिल्ह्यातील सर्व बोर्डाच्या शाळा आणि कॉलेजला सरकारची मान्यता मिळेल.पुढील महिन्यात धनंजय जाधव यांच्या अध्यक्ष ते खाली असोसिएशन च्या वतीने पुणे शहरात जिल्हास्तरीय, cbsc बोर्ड इंटर स्कुल, तसेच सर्वासाठी खुली डान्स स्केट स्पर्धा होणार आहेत.

धनंजय जाधव हे पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष, द हिंदू फाउंडेशनचे सं. अध्यक्ष असून पुणे जिल्ह्याची मनाची पुणे श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, बॉक्सिंग, पॉवर लिफ्टिंग, क्रिकेट, खोखो स्पर्धा, पेसापालो स्पर्धा आयोजित करतात. २०१९ साली १० देशांचा सहभाग असलेली पेसापालो वर्ल्ड कप स्पर्धा तसेच २०२० साली १२५० खेळाडूंचा सहभाग असलेली, २३ राज्याचा सहभाग असलेली राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती.

दरवर्षी क्रीडा पुरस्काराचे आयोजन करून विविध क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळी वरील खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रशिक्षक यांना “क्रीडा गौरव पुरस्काराने” सन्मानित करतात.

इतर पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची ही निवड खालील प्रमाणे

धनंजय विष्णू जाधव अध्यक्ष. मार्क भस्मे चेअरमन. राजेंद्र(बाबू) वागसकर उपाध्यक्ष. विभाकर तेलोरे उपाध्यक्ष. श्रुती कौशल क्लारेन्स उपाध्यक्ष . विशाल देसाई व्हाइस चेअरमन. संजयमामू कांबळे जनरल सेक्रेटरी. सचिन शिंदे जॉईंट सेक्रेटरी. रवींद्र साठे खजिनदार. धनंजय मदने सहखजिनदार. मिलिंद क्षीरसागर टेक्निकल डायरेक्टर. जयंत देशपांडे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर. असद शेख मीडिया हेड. किरण पाटोळे चिप ॲडव्हायझर. तनवीर शेख सल्लागार. प्रवीण परुळेकर प्रमुख ऑब्जरवर. शायनी म्हस्के हेड कोरोग्राफर अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

समस्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय बावधनचे कचरा‌ संकलन केंद्र सुरु करू नका- चंद्रकांत पाटील‌

Posted by - May 9, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेला कोथरुडमधील बावधन येथील कचरा‌ संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…
anna hazare and jitendra awhad

Anna Hazare : जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

Posted by - October 8, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री श्री. जितेंद्र सतिश आव्हाड रा.ठाणे, मुंबई यांना जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांनी…

पुणेकर झिकाच्या विळख्यात ? झिकाच्या रुग्णांची संख्या वाढली! पुणेकरांनो अशी घ्या काळजी

Posted by - July 7, 2024 0
पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे टेन्शन वाढले आहे. नुकतंच पुण्यातील आणखी तीन गर्भवती…

RAIN UPDATE : मुठा नदीत विसर्ग वाढवला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - September 13, 2022 0
पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधार सुरूच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *