माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

275 0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून श्री. बागुल यांनी पदभार स्वीकारला.

याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून श्री. बागुल यांचे स्वागत केले.

महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही श्री. बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. श्री. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी श्री. बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी श्री. बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले; पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - December 3, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून निलेश माझेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून…

तीन मोठे प्रकल्प गुजरातला कसे गेले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी -सुप्रिया सुळे

Posted by - October 30, 2022 0
पुणे: महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून…
election-voting

ईव्हीएममध्ये कॅमेरा?… बोटाला शाईही नाही?… कधीपासून होणार बदल…

Posted by - May 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे.…

पिंपरी-चिंचवड महापालिकेला आली जाग, भोसरीच्या उड्डाणपुलाला १२ वर्षानंतर सुरक्षा कठडे

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा…

ह्या कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

Posted by - December 4, 2022 0
बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर ‘वध’ या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *