Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

284 0

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे.

तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.
सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत.

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

Share This News

Related Post

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? यावर प्रकाश आंबेडकरांनी केले ‘हे’ सूचक वक्तव्य

Posted by - January 1, 2024 0
पुणे : 206 व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची नियुक्ती

Posted by - September 25, 2022 0
मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात…
Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : गुवाहाटीचा खर्च मी केला; संजय गायकवाडांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Posted by - September 1, 2023 0
बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आमदार आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जोरदार प्रत्युत्तर…
eknath shinde

राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिला आणि बालकांसाठी नवी हेल्पलाईन सुरु करणार

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला आणि बालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील संकटग्रस्त महिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *