पुणे महापालिकेत लवकरच नव्या 200 पदांची भरती; आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदांसाठी भरती

258 0

पुणे : पुणे महापालिकेत नव्या 200 पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे.

महापालिकेकडून सध्या 448 पदांची भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, लिपिक, अतिक्रमण सहायक निरीक्षक, सहायक विधी सल्लागार या पदांवरील 448 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ऑनलाइन परीक्षेनंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर कनिष्ठ अभियंता पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यातच या नव्या दोनशे पदांची भर पडणार असल्याची महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी माहिती दिली.

डिसेंबर महिन्यात 200 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये काही जागा या वरिष्ठ पदाच्या असणार आहेत. महापालिकेत 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्याने 2007 मध्ये तयार केलेल्या आकृतिबंधातील जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात आकृतिबंधाचा आढावा घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल, असंही आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

Share This News

Related Post

#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

Posted by - March 24, 2023 0
भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा…
Adv. Yashwant Jamadar

Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

Posted by - January 29, 2024 0
पुणे : आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात…

पर्वती जनता वसाहतीमध्ये टोळक्याचा धुडगूस, कोयते नाचवत १२ हुन अधिक वाहनांची तोडफोड

Posted by - June 9, 2022 0
पुणे- स्वारगेटजवळ बुलेट गाडी फोडल्याच्या रागामधून निल्या वाडकर टोळीमधील गुंडांनी पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीमध्ये राडा करत १२ पेक्षा अधिक…

ब्रेकिंग न्यूज ! गुजरातमध्ये मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील मोरबी येथील हलवड भागात एका मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० मजूर अडकले…
pune police

PUNE: जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *