तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

316 0

पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून राज्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे.

पुणे जिल्ह्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे चांगले वातावरण तयार होईल. रांजणगाव येथील हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 297.11 एकरमध्ये पसरले जाईल आणि याच्या विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील.  यामधील २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.

प्रकल्पाचे लक्ष्य 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 5 हजार रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आहे. काही वेळापूर्वी या प्रकल्पाला नवी दिल्लीत मान्यता मिळाली असल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनने काम सुरु केले आहे, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक आहे. इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात या निमित्ताने येणार आहेत.

Share This News

Related Post

Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार? भाजपकडून चाचपणी सुरु

Posted by - September 1, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ…
Pune News

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात…

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - April 13, 2023 0
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि…

पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का! शर्मिला येवले यांचा युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शर्मिला येवले यांनी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे.…
Congress

Pune Loksabha : काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी तब्बल 20 जण इच्छुक; ‘या’ बड्या नावांचा समावेश

Posted by - January 9, 2024 0
पुणे : लोकसभेच्या निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे प्रत्येक पक्ष पक्षबांधणीला (Pune Loksabha) सुरुवात करताना दिसत आहे. प्रत्येक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *