महत्वाची माहिती : बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये? केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

383 0

नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर क्राईमचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नोकरी विषयक किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणा-या कोणत्याही पोस्टवर शहानिशा न करता विश्वास थू नये असे केंद्र सरकारने घोषित केले आहे.

व्हॅट्सऍपवरून व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने’अंतर्गत बेरोजगार तरुणांना सरकारकडून दरमहा 6,000 रुपये भत्ता दिला जात आहे. असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतची माहिती सरकारने ट्विट करून दिली आहे.

पीआयबीने अधिकृत ट्विटर (Twitter) अकाउंटवर फॅक्ट चेकद्वारे माहिती दिली आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, अशी कोणतीही योजना सरकार चालवत नाही.

ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हा मेसेज खोटा आहे आणि भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. यासोबतच असे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहनही पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तुम्ही PIB द्वारे ते तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही यासंबंधीची माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकता.

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी १६ जण इच्छुक

Posted by - April 1, 2023 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्च राेजी संपली. या पदासाठी १६ जणांनी अर्ज दाखल केले…

आयुष्मान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 23, 2022 0
पुणे : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर दर्जेदार…
sharad pawar

Sharad Pawar : शरद पवार यांचे बंडखोरांवर थेट कारवाईचे संकेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

Posted by - July 18, 2022 0
मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती…

टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यामुळे कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

Posted by - March 28, 2022 0
कोल्हापूर- कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *