राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

131 0

मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Beed News

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Posted by - December 12, 2023 0
बीड : काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसक वळणाचा सर्वाधिक फटका बीड (Beed News) जिल्ह्याला बसला…
Kalyan Crime News

Kalyan Crime News : खळबळजनक ! बायको आणि मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - December 2, 2023 0
कल्याण : कल्याणमधून (Kalyan Crime News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी पतीने बायको आणि मुलाची गळा…
Onion Export

Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय

Posted by - March 23, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) बंदी…

धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *