जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

186 0

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब अशा ठिकाणी दिली जाईल जिथे लोकांची मोठी गर्दी असते. जिओ ट्रू 5जी समर्थित वाय-फाय आज राजस्थानमधील नाथद्वारा या पवित्र शहरातून लॉन्च करण्यात आले.

जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल. इतर नेटवर्क वापरणारे देखील जिओ 5जी समर्थित वाय फाय चा मर्यादित वापर करू शकतील. पण जर त्यांना जिओ 5G पॉवर्ड वाय फाय ची पूर्ण सेवा वापरायची असेल तर त्यांना जिओ चे ग्राहक बनावे लागेल. विशेष म्हणजे जिओ ट्रू 5G वाय फाय शी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो.

जिओ ट्रू 5G समर्थित सेवेसोबत, जिओची ट्रू 5G सेवा देखील नाथद्वारा आणि चेन्नई येथे सुरू झाली आहे. अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथेही 5G सेवा सुरू करण्यात आली. इतर शहरांमध्ये लवकरच जिओ 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि ट्रू 5G हँडसेटची उपलब्धता वाढवण्यासाठी जिओ टीम चोवीस तास काम करत आहेत.

देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देताना आकाश अंबानी म्हणाले, “भगवान श्रीनाथजींच्या आशीर्वादाने आज नाथद्वारामध्ये जिओ ट्रू 5 G च्या सेवेसह 5G पॉवरवर चालणारी वायफाय सेवा सुरू होत आहे. आमचा असा विश्वास आहे की 5G सर्वांसाठी आहे, त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की जिओची ट्रू 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यान्वित व्हावी. श्रीनाथजींच्या आशीर्वादाने नाथद्वारा आणि चेन्नई ही आजपासून जिओ ट्रू 5G शहरे बनली आहेत.”

नाथद्वारा हे राजस्थानमधील पहिले शहर आहे जेथे कोणत्याही ऑपरेटरने 5G सेवा सुरू केली आहे. तथापि, कंपनीने अद्याप व्यावसायिक लॉन्चची घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर दक्षिण भारतातील चेन्नई शहर देखील कंपनीच्या 5G सेवा नकाशावर आले आहे.

 

Share This News

Related Post

धक्कादायक : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; असे काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुण्यातील केशवनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. केशवनगर भागात राहणाऱ्या एकाच…

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या

Posted by - July 5, 2022 0
विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांचा हुबळी येथे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. हुबळी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

Posted by - December 11, 2022 0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री…

अजित पवार यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती

Posted by - June 27, 2022 0
मुंबई- एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर सत्तेवरून पायउतार होण्याचे काळे ढग जमा झाले असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची…

बागेश्ववर बाबानं पुन्हा उधळली मुक्ताफळं; म्हणाले साईबाबा….

Posted by - April 2, 2023 0
नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *