अर्थकारण : वापरात नसलेले बँक खाते पुन्हा चालू करायचं आहे ?

290 0

दीर्घकाळ एखाद्या बँक खात्यातून व्यवहार झाले नाहीत तर ते खाते इनऑफरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते म्हणून ओळखले जाते. सलग दोन वर्षे एखाद्या खात्यात कोणताच व्यवहार झाला नाही, तर ते खाते इनऑपरेटिव्ह म्हणून ओळखले जाते. तुमचे खाते इनऑपरेटव्हि ठरवले गेले तर त्यातून तुम्हाला कोणतेच व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे असे खाते ग्राहकांना ऑपरेटव्हि करून घेणे म्हणजे पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करून घेणे आवश्यक असते.

आपले वापरात नसलेले खाते पुन्हा वापरात आणण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याकरिता ग्राहकाने बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या खात्याची नेमकी स्थिती काय आहे, याचा शोध घ्यावा.

  • बँकांच्या संकेतस्थळांवर ज्या ज्या ग्राहकांची खाती इनऑपरेटीव्ह झाली आहे, त्याची माहिती दिलेली असते. बँकांना आपल्या संकेतस्थळावर अशा खात्यांची माहिती ठेवणे आवश्यक असते.
  • वापरात नसलेले खाते पुन्हा चालू करण्यासाठी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाला अर्ज द्यावा लागतो. तुमचे खाते दीर्घकाळ का वापरात नव्हते, याचे कारण या अर्जामध्ये देणे आवश्क असते. जर तुमचे खाते जॉईंट असेल तर सर्व खातेदारांच्या सह्या अर्जावर असणे आवश्यक असते.
  •  या अर्जाबरोबरच केवासीची कागदपत्रेही सादर करावी लागतात. त्यात आपले छायाचित्र, पॅनकार्ड, राहत्या जागेचे पुरावे आणि ओळखीचे पुरावे अशा कागदपत्रांचा समावेश असतो.
  •  ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या खात्यामध्ये काही रक्कम भरण्यास सांगितली जाते.
  • रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार इनऑपरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते पुन्हा चालू करण्याकरिता बँक ग्राहकांकडून कसलेच शुल्क घेत नाहीत. जर तुमची त्या बँकेत मुदत ठेव असेल आणि त्यामुदत ठेवीचे व्याज बचत खात्यात नियमित पद्धतीने जमा होत असेल तर आपले खाते इनऑपरेटीव्ह होत नाही. जर तुम्हाला एखादे खाते वापरायचेच नसेल तर ते सरळ बंद करणेच योग्य ठरते.
  • एकापेक्षा अनेक बँक खाती चालू ठेवणे अनेकांना शक्य नसते. यामागे वेगवेगळी कारणे असतात. आपापल्या सोयीचा विचार करून ग्राहक कोणत्या खात्यात नियमित व्यवहार करायचे याचा निर्णय घेत असतात. त्यामुळे जे खाते वापरण्याची इच्छा नसेल ते खाते बंद करणे योग्य ठरते.
Share This News

Related Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 हजार कुटुंबांची दिवाळी गोड

Posted by - October 20, 2022 0
पुणे : कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे नाममात्र दरात केवळ ₹१००/- प्रति किलो…

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे नवे पाऊल

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि 27,81,69,631 बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. ई-वाहन पोर्टल (रस्ते…
HDFC

एचडीएफसी फायनान्सचे एचडीएफसी बँकमध्ये होणार विलीनीकरण

Posted by - April 4, 2022 0
नवी दिल्ली- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होत आहे. विलीनीकरणाच्या या करारांतर्गत एचडीएफसी बँकेत 41% वाटा…

#MIT PUNE : एमआयटी टीबीआयतर्फे नवउद्योजकांना स्टार्टअप प्रशिक्षण व अर्थसहाय्य

Posted by - January 31, 2023 0
एमआयटी संस्थेचे संस्थापक प्रा.प्रकाश जोशी यांच्या मार्गदर्शनात टीबीआयची गरूड झेप पुणे : माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत सुरू असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *