पुणे : वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे स्वतः उतरल्या रस्त्यावर VIDEO

236 0

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे.सोलापूर रोड असो किंवा सासवड रोड नित्याची वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते. या वाहतूक कोंडीत जर लोकप्रतिनिधी अडकले तर त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आज फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर खासदार सुप्रिया सुळे याही या वाहतूक कोंडी मध्ये अडकल्या. त्यांनी आपल्या गाडीतून उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

अजूनही या रोडवर मोठमोठे खड्डे आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचलेले आहे. साईट पट्ट्यांमध्ये मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या परिसरात होत असते. मंत्री, आमदार, खासदार या रस्त्याने जाताना वाहतूक पोलीस थांबवून वाहतूक कोंडी सुरळीतही होईल. मात्र सर्वसामान्य नागरिकांना, वाहन चालकांना या वाहतूक कोंडीस रोजच सामोरे जावे लागत आहे.

अनेक दिवसांपासून येथील स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थ याबाबत आवाज उठवत आहे, आंदोलनही करत आहेत, मात्र या रस्त्याची दुरावस्था पाहून अधिकाऱ्यांनाही घाम फुटत नाही. खासदार आता यावर काय करतील. याबाबत काही आदेश देतील का. याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडीत अडकल्याने किमान येथील नागरिकांची होणारी कोंडी त्यांना समजली असेलच. असा आशावाद येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सोलापूर रस्त्यावर गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ते पाणी काढण्यात प्रशासनाला यश येत नाही. त्यामुळे येथील वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे.

Share This News

Related Post

MP Girish Bapat : पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करा ; केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी

Posted by - July 22, 2022 0
नवी दिल्ली : पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक…

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

Posted by - March 15, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची…

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती

Posted by - October 4, 2022 0
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३…

पुण्यात ‘या’ तारखेला होणार महाविकास आघाडीची विराट सभा

Posted by - March 12, 2023 0
शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात…

ठोस पुराव्याच्या अभावी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन

Posted by - April 4, 2023 0
व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *