BIG NEWS : BCCI च्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती, तर कोषाध्यक्षपदी आशिष शेलार

373 0

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिव पदी जय शहा आणि कोषाध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

BCCI च्या पदाधिकारी निवडणुकीसाठी 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये ही निवडणूक पार पडली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले.

रॉजर बिन्नी हे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 या कार्यकालामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आजपर्यंत सत्तावीस कसोटी सामन्यांमध्ये 830 धावा केल्या असून 72 एक दिवसीय सामन्यांमध्ये 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकवले आहे. 27 कसोटींमध्ये 47 विकेट्स घेतलेले रॉजर बिन्नी यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर त्यांचा 1983 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

Share This News

Related Post

Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25…

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

Posted by - December 27, 2022 0
पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर…

BIG NEWS : फडणवीसांना होम ग्राउंडवर मोठा धक्का ; नागपुरात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजय

Posted by - February 2, 2023 0
नागपूर : गडकरी,फडणवीसांना होम ग्राउंड वर मोठा धक्का बसला आहे. नागपुरात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजय झाले आहेत. 

पुणे शहर हादरले : पुणे कंट्रोल रूमला सासू मारहाण करत असल्याचा आला फोन; घरी जाऊन पोलिसांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं…

Posted by - February 22, 2023 0
पुणे : पुण्यातील कोथरूड मधून पोलीस कंट्रोल रूमला फोन आला. यातील महिलेने सासू मारहाण करीत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलीस…

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू

Posted by - June 8, 2024 0
दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *