तुम्हाला माहित आहे का, भयानक स्वप्न का पडतात ? त्यावर काही उपाय असतो का ? तज्ज्ञ सांगतात…

426 0

आज पर्यंत तुम्हाला अनेक वेळा जाणवले असेल, दिवस छान जातो, कोणतीही अनुचित घटना घडत नाही. पण तरीही रात्री शांत झोप लागल्यानंतर अचानक एखादं स्वप्न खूप भयानक पडत. अगदी तुम्ही डचकूनही उठता ,बऱ्याच वेळ त्या स्वप्नाचा विचार करतात आणि थोड्यावेळाने ते स्वप्न होतं म्हणून पुन्हा झोपून घेता. पण असं का होत असावं ?

तुम्ही जर कधी शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला जाणवेल की आज पर्यंत तुम्हाला जी भीतीदायक स्वप्न पडले आहेत ती तुमच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या घटनेचा धागा दोरा धरूनच पडलेली स्वप्न असतात. जसे की तुम्ही कधीतरी एखादी कथा वाचली असेल, एखादा चित्रपट, एखादी भयानक घटना कोणाकडून ऐकली असेल, एखादा अपघात, हत्या या गोष्टी पाहिल्या असतील. अशावेळी मेंदू अनेक गोष्टींचा गुंता करून एक स्वप्न तुम्हाला पडते.

याला जोड असते ते तुमच्या इच्छा आकांक्षांची… तुम्हाला बराच वेळा एखाद्या गोष्टीची भीती असते. एखादा जवळचा व्यक्ती त्याला कधीच काही होऊ नये असं तुम्हाला वाटत असतं. पण स्वप्नात नेमका तुम्हाला उलटच दिसतं. त्या जवळच्या प्रिय व्यक्तीला काहीतरी झालंय किंवा अगदी त्या व्यक्तीचं निधन झालंय असं देखील स्वप्नात दिसत. आणि यापेक्षा वाईट स्वप्न दुसरं काही असूच शकत नाही. यासाठीच तुमच्या इच्छा, तुमच्या भावना आणि तुम्ही वास्तवात पाहिलेल्या घटना यातूनच हे स्वप्न पडत असावीत.

तसेच डॉक्टर्स सांगतात की, काही आजार देखील असे असतात जसे की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि नाईट मेयर डीसोर्डर यामुळे देखील भीतीदायक स्वप्न पडतात. अशा व्यक्तींना योग्य उपचार आणि समुपदेशनाची गरज असते. त्याचबरोबर तज्ञ सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपेत असते त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतो.

Share This News

Related Post

पुणे : काल राञभरात आगीच्या दोन मोठ्या घटना; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण, जिवितहानी टळली

Posted by - January 13, 2023 0
पुणे : काल मध्यराञी १२•१० वाजता (दिनांक १३•०१•२०२३) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सिहंगड रस्त्यावर राजाराम पुल येथे एमएनजीएल कंपनीची गॅस…

महावितरणचा खाजगीकरणा विरोधात आक्रमक पवित्रा; कर्मचारी तीन दिवस संपावर

Posted by - January 3, 2023 0
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.…

पुणेकरांसाठी उपयुक्त माहिती : पुणे महापालिकेच्या 80 सेवा आता व्हॉट्सॲपवर ; व्हॉट्सॲपवर सेवा देणारी देशातील पुणे पहिली महापालिका

Posted by - January 11, 2023 0
पुणे : नागरिकांशी संवाद साधणं सोपं व्हावं यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप बॉट अर्थात माहिती देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा प्रणालीवर…
Government Scheme

Government Scheme : गोष्ट तुमच्या कामाची माहिती शासकीय योजनांची; काय आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना?

Posted by - September 17, 2023 0
नवीन व्यवसाय करणाऱ्या युवकांना 15 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी महाराष्ट्र शासनाची बिनव्याजी कर्ज योजना (Government Scheme) .अण्णासाहेब पाटील…

दिव्यांची अमावस्या : आज अशी करा घरातील दिव्यांची पूजा ; घरातील दारिद्य होईल दूर…!

Posted by - July 28, 2022 0
दिव्यांची अमावस्या : आषाढ महिन्याच्या अमावास्या तिथीला घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते. यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *