“जे काही नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा !” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

202 0

पुणे : भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात एक वेळ आई-वडिलांना शिव्या घातल्या तर चालतील मात्र मोदी शहाणा शिव्या घातलेल्या सहन करणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी खास पवार शैलीत चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे जे काही नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा. आई-वडिलांचा अपमान करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही असं रोहित पवार पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांनी मुंबई पालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला परंतु पालिका राजीनामा घेत नाही. त्यावर यात वेगळं राजकारण असावं कारण लोकांनी अनेक गोष्टी मागील काही दिवसांपासून बघितलेल्या आहे सध्या नेत्यांचाही आवाज दाबला जातोय, असा आरोप. रोहित पवार यांनी केलाय.

रोहित पवार पुणे विद्यापीठात भरमसाठ शुल्क वाढी विरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.त्यात सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा विषय अजित पवार यांना सांगितला आहे. अशा पद्धतीने फी वाढ करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय आम्ही नेणार आहोत. तीन हजार असणारी फी आठ हजार झाली आहे. मुळात भाजपची काम करण्याची पद्धत म्हणजे ते यादी बघून काम करतात, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीशी त्यांना देणंघेणं नसतं. पूर्वी हे विद्यापीठ कितव्या क्रमांकावर होतं आणि आज कितव्या क्रमांकावर आहे? ही गंभीर बाब आहे.’ असं सांगून रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारदरबारी मांडणार असल्याचं सांगितलं.

भाजपचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या ताब्यात असलेल्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा गळती हंगाम सुरु झाला नसल्याचं निदर्शनास आणल होतं त्यामुळे रोहित पवार यांची चौकशी सुरू होती .राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्याला क्लिन चीट दिली. त्यामुळे रोहित पवार यांना दिलासा मिळाला. त्यावर मी राम शिंदे यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा कारखाना सुरू केला होता. असे रोहित पवार म्हणाले.

Share This News

Related Post

सांगलीचे खासदार संजय पाटील भाजपाला सोडचिठ्ठी देणार ?

Posted by - March 27, 2022 0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगली जिह्ल्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तेथील राजकारणातही खळबळ नेहमीप्रमाणे उडाली. खासदार संजय पाटील यांनी येथील  आपली…
Offensive Video

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ (Offensive Video) सध्या व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओवरून (Offensive Video)…

महत्त्वाची सूचना : मुळशी धरणाच्या सांडव्यावरून ११४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

Posted by - August 12, 2022 0
महत्त्वाची सूचना : मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पर्ज्यन्याचा कल वाढलेला आहे. दू. ५ः०० वा धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग ९१७६ क्युसेकवरून…

महत्वाची माहिती : बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये? केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

Posted by - October 29, 2022 0
नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर…

फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्यास कोर्टाचा नकार

Posted by - December 28, 2022 0
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. या प्रकरणाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *