शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं; “हात जोडून सांगतो साहेब कळकळीची विनंती … !”

416 0

जालना : देशभरात लम्पी आजारानं थैमान घातलेलं असताना लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र सध्या चर्चेत आहे. शेतकऱ्यानं नेमकी काय व्यथा मांडली आहे पाहूया.

जालना जिल्ह्यातील कृष्णा एकनाथ खरात या शेतकऱ्याने लम्पी आजाराविषयी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. कृष्णा एकनाथ खरात असं या शेतकऱ्याचं नाव असून जालना जिल्ह्यातील रोषणगाव येथील रहिवासी आहे. रोषणगाव परिसरात लम्पी आजारामुळे १६ जनावरं दगावली आहेत. तसच दोनशेपेक्षा जास्त जनावरांना लम्पी आजारानं ग्रासलं आहे.

मात्र, एक महिन्यापासून ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी गैरहजर असल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळं ग्रामसेवक संघटनांनी शिक्क्यावर बहिष्कार टाकला आणि शेतकरी अडचणीत सापडला. याच कारणास्तव ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं.

जनावरांना होणाऱ्या लम्पी आजारामुळे राज्यभरातील शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे स्थानिक प्रशासन, राज्य सरकारन कधी लक्ष देणार हाच प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांतून उपस्थित केला जातोय.

Share This News

Related Post

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Posted by - April 4, 2023 0
अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
Maharashtra Rain

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 20, 2024 0
हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील…

‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

Posted by - July 22, 2022 0
पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच…

पठाणचा बिकनी वाद : सेन्सर बोर्डाने सांगितले ‘हे’ बदल; दीपिकाच्या बिकनीचा रंग बदलणार का ?

Posted by - December 29, 2022 0
मुंबई : चार वर्षानंतर कमबॅक करताना शाहरुख खान आपल्या पठाण चित्रपटांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहू नये याची चांगलीच काळजी घेत…

मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील 846 शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - February 14, 2023 0
मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *