रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम, नियम मोडल्यास होऊ शकते कडक कारवाई

620 0

पुणे – बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करत असताना रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते कारण अनेक लोक ग्रुपने प्रवास करत असतात.याचाच त्रास इतर प्रवाश्यांना अधिक होतो. भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता रात्रीच्या वेळेस तुम्हाला असं करता येणार नाही आणि या नव्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते.

रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास लक्षात घेऊन केलेल्या मोठ्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची तक्रार करतात. याशिवाय रात्रीच्या वेळी काही प्रवासी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. इतकेच नाहीतर रेल्वे कर्मचारी देखील रात्रीच्या वेळी गप्पा मारत असल्यामुळे झोप खराब होत असल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. त्यामुळे रात्री उशीरा मोठ्या आवाजामध्ये कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही.

प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठ्या आवाजात फोनवर बोलत असणाऱ्या किंवा गाणे ऐकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे नियम लागू केले आहेत विशेष म्हणजे रेल्वेमधील प्रवाशांकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

जाणून घेऊया नेमके हे नियम काय आहेत-

– कोणत्याही प्रवाश्याला रात्री 10 नंतर मोठ्याने बोलता किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकता येणार नाही.
– रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची झोप खराब होऊ नये. यासाठी नाईट लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद राहतील.
– ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गप्पा मारत बसता येणार नाहीत.
– तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार.

Share This News

Related Post

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…

हर्षद कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

Posted by - March 22, 2022 0
पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद…

गुजरातेत घड्याळाचे काटे फिरले ! राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा पक्षाला रामराम

Posted by - November 15, 2022 0
गुजरातमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फिरल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जाडेजा यांनी पक्षाला रामराम…
Parniti And Raghav

सिड कियाराच्या वाटेवर परिणीती चोप्रा; ‘या’ आलिशान पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ; पहा आलिशान पॅलेसचे फोटो

Posted by - June 10, 2023 0
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याने त्यांचे वेडिंग डेस्टिनेशन…

Maharashtra Politics : OBC समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे ,यासाठी आम्ही प्रयत्न केले…! – जयंत पाटील

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील स्थानिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *