अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई ; 324 किलो भेसळयुक्त गूळ जप्त

348 0

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो भेसळयुक्त गूळ तर २२ हजार १०० रुपये किंमतीची ६५० किलो भेसळयुक्त साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर  कारवाई करताना या प्रकरणी घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्यास २० हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गूळ उत्पादन करावे. याबाबतीत माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Posted by - January 18, 2024 0
पुणे : अयोध्येतील राममंदिराच्या (Ram Mandir) गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून 22 तारखेला या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा…

नविन कामगार कायदे धोरणाविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांचे प्राणांतिक उपोषण

Posted by - August 6, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार व श्रमिकांची दैन्यवस्था झालेली आहे. कायमस्वरूपी नोकऱ्यांवर कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम  १९७० चा…

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील यवत येथून १० वर्षीय मुलीचे अपहरण

Posted by - April 17, 2023 0
पुणे जिल्ह्यातील यवत गावातून एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. घराबाहेर खेळायला जाते असे सांगून…

पुणे मनपा बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेऊ नये; आनंदनगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे मिळण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची मागणी

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले…
Imran Khan

पंतप्रधान इम्रान खानची पाकिस्तान उडवतोय खिल्ली, कारण काय ? पाहा व्हिडिओ

Posted by - April 2, 2022 0
कराची- पाकिस्तानात उठलेल्या राजकीय वादळात इम्रान खान यांना आता पायउतार होण्याची वेळ आलेली आहे. इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारमधील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *