साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा ; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

123 0

मुंबई : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

यंदाच्या हंगामासाठी उस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे.

इथेनॉल निर्मिती मध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

Share This News

Related Post

राज ठाकरे घरी परतले ! शस्त्रक्रिया यशस्वी, पुढचे काही महिने आराम करण्याचा सल्ला

Posted by - June 25, 2022 0
मुंबई,- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे…

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना 2 कोटी रुपये; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख 2 कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
BJP

Maharashtra Politics : राज्यात भाजपला पाहिजे तेवढं यश न मिळाल्याने ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - June 5, 2024 0
अमरावती : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात (Maharashtra Politics) मोठा फटका बसला आहे. भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं…

अपुऱ्या पगारामुळे पुणे महानगरपालिकेच्या शाळांकडे शिक्षकांनी फिरवली पाठ

Posted by - September 15, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही शाळा सोडल्याचा दाखल्याविना मनपा शाळेत प्रवेश द्यावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *