चिनी लोन ॲप वरून लोन घेताय सावधान! ही माहिती ठरेल तुमच्यासाठी उपयुक्त

130 0

चिनी लोन ॲप्सवरून कर्ज घेतल्यानंतर त्याच्या जाळ्यात अडकल्याची शेकडो प्रकरणं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. काहींनी तर कर्जाचे हप्ते भरू न शकल्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं दिसून आलंय. या इन्स्टंट लोन ॲप्सचं जाळं गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलंच पसरलं असून कोरोनाकाळानंतर या ॲप्सनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. जाणून घेऊयात या चिनी लोन ॲप्स विषयी…

मोबाइलच्या प्लेस्टोअर्समध्ये कर्ज देणारे हजारो बेकायदेशीर ॲप्स आपल्या नजरेस पडतात. अंमलबजावणी संचालनालय आणि एसएफआयओच्या तपासात अशा अनेक बेकायदेशीर ॲप्सचं चीन कनेक्शन समोर आलंय. संसदेतही या चिनी लोन ॲप्ससंबंधी प्रश्न उपस्थित केला गेला. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या या लोन ॲप्सविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारकडं पुरेसे नियम आणि कायदे आहेत का ? असा सवाल विचारण्यात आला होता. एकट्या ओडिशात असे दीड लाख ॲप्स डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा ॲप्सवर कारवाई करण्यासाठी अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार, माहिती व तंत्रज्ञान आणि गृह मंत्रालय एकत्रितपणे काम करत असल्याचं उत्तर दिलं.

ही लोन ॲप्स कसं काम करतात ? कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास कर्ज वसुलीसाठी कसं ब्लॅकमेल करतात ? हेही पाहूयात.

लोन ॲप्स कसं काम करतात ?

  • लोन ॲप्स डाऊनलोड करताना द्यावी लागते कॉन्टॅक्ट्स, इमेज ॲक्सेसची परवानगी
  • हे ॲप्स देतात 2000 ते 10000 रुपयांपर्यंतचं कर्ज
  • प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कापली जाते मोठी रक्कम
  • जवळपास 70 ते 80 % रक्कम बँक खात्यात केली जाते ट्रान्सफर
  • कर्जावर आकारला जातो खूप जास्त व्याजदर
  • कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास पहिल्या दिवसापासून आकारला जातो दंड
  • कर्ज वसुलीसाठी लोकांना ब्लॅकमेल करून दिली जाते धमकी
  • कर्जदारांची एडिट केलेली नग्न छायाचित्रं पाठवली जातात नातेवाईकांना

भारतात झटपट कर्जाचा व्यवसाय सध्या खूप वेगानं पसरल्याचं दिसून आलं आहे. 2017 मध्ये इन्स्टंट ॲप्सवरून 11 हजार 617 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. 2021 मध्ये तो 1 लाख 41 हजार 821 कोटी रुपयांवर जाऊन पोचलाय. या लोन ॲप्सद्वारे जास्त व्याजदरानं पैसे घेतलेल्या लोकांना कर्जाची परतफेड करण्यास थोडा जरी उशीर झाला तर ब्लॅकमेकिंगला सामोरं जावं लागतं. हे लोन ॲप्स कोणत्याही अंडररायटिंगशिवाय तात्काळ पैसे देतात मात्र त्यानंतर त्या कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात. जोपर्यंत तुम्ही वेळेवर पैसे भरता तोपर्यंत सर्व काही सुरळीत असतं पण जेव्हा तुम्ही कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यास उशीर करता तेव्हा मात्र सर्व काही बिघडायला लागतं.

तर नागरिकांनो, अशा चिनी लोन ॲप्सकडून कर्ज घेण्याच्या फंदात अजिबात पडू नका आणि कर्ज घेऊन तुम्ही फसला असाल पोलिसांकडे एफआयआर दाखल करून कायदेशीर सल्ला घ्यायला विसरू नका. एका वाक्यातच सांगायचं म्हटलं तर वापरू नका चिनी लोन ॲप्स; आयुष्य होईल कोलॅप्स..!

Share This News

Related Post

ग्रामपंचायत निवडणुकीवर महायुतीचं वर्चस्व कायम

Posted by - November 6, 2023 0
राज्यात ग्रामपंचायतच्या 2369 जागांसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती या ग्रामपंचायतीत निवडणुकांचे आज मतमोजणी होत असून या ग्रामपंचायतींमध्ये महायुतीचं…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या ११ व्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित

Posted by - April 12, 2022 0
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त…

Pune Accidents : हॅन्ड ब्रेक लावायला विसरला चालक : ट्रॅक्टरने दिली 6 वाहनांना धडक

Posted by - July 16, 2022 0
पुणे : बिबवेवाडी मध्ये एक विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे. अप्पर जुना बस स्टॉप भागामध्ये एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! हा विशालला वाचवतो, याला संपवून टाका; असे म्हणत तरुणाची हत्या

Posted by - October 1, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, रावडेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *