गृहखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या सुशील मंत्रीच्या मुलाला फसवणूक प्रकरणी CID कडून अटक

248 0

बेंगळुरू : फ्लॅटचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील पी. मंत्री आणि त्यांचा मुलगा प्रतीक मंत्री यांना अटक केली आहे.

मंत्री डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही मालमत्ता विकास कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिता-पुत्राना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली होती, त्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीवर लोकांना फ्लॅट देण्याचे आश्वासन देणे, मोठ्या प्रमाणात पैसे घेणे आणि गुंतवणूकदारांची फसवणूक करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या कंपनीविरुद्ध कब्बन पार्क आणि सुब्रह्मण्यपुरा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सीआयडीने ताब्यात घेतले आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशील मंत्रीला नुकतीच अटक केली होती आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

Share This News

Related Post

चिंताजनक : ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट देणार १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

Posted by - November 22, 2022 0
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटा ही लवकरच दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. तथापि कंपनीने अद्याप…

पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Posted by - December 21, 2022 0
  पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
Bribe Viral News

Bribe Viral News : मला पास करा.. पेपर अवघड गेला आहे असे म्हणत चक्क विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत ठेवल्या 200 आणि 500 ​​च्या नोटा

Posted by - August 22, 2023 0
देशात लाच घेणे (Bribe Viral News) व लाच देणे हे काही नवीन नाही या साठी (Bribe Viral News) लोक वेगवेगळी…

मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई, या छापासत्राबाबत काय म्हणाले संजय राऊत ?

Posted by - February 15, 2022 0
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराची माहिती घेण्यासाठी मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई सुरु आहे. हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *