ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत २२ सप्टेंबरर्पंत निर्बंध लागू

199 0

पुणे : पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून २२ सप्टेंबरर्पंत हे निर्बंध राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात असून १८ सप्टेंबरला मतदान तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख २२ सप्टेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

२२ सप्टेंबरपर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई
या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

१३ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश
जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो अशा १३ शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिले आहेत. यामध्ये जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६, घोडेगाव- ४, खेड- १ आणि ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील २ शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. २२ सप्टेंबरनंतर ७ दिवसांच्या आत संबंधितांना शस्त्र परत करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदान व मतमोजणी केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश
६१ ग्रामपंचायतीसाठी १८ सप्टेंबर मतदानाचा दिवस ते १९ सप्टेंबर रोजी मतमोजणीचा दिवस या कालावधीत मतदान केंद्र तसेच दिवशी मतदान केंद्राच्या परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना…
Vijay Shivtare

Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान

Posted by - March 22, 2024 0
पुणे : सध्या बारामती लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता…

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

Posted by - February 13, 2022 0
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास…
Sambhaji Bhide

Bhide Guruji : पुण्यातील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल

Posted by - September 3, 2023 0
पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे भिडे गुरुजींच्या (Bhide Guruji) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य…

तुम्हाला माहित आहे का, भयानक स्वप्न का पडतात ? त्यावर काही उपाय असतो का ? तज्ज्ञ सांगतात…

Posted by - October 18, 2022 0
आज पर्यंत तुम्हाला अनेक वेळा जाणवले असेल, दिवस छान जातो, कोणतीही अनुचित घटना घडत नाही. पण तरीही रात्री शांत झोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *