गंगाधाम चौक येथील आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बिहार स्टाईल गुंडगिरी – प्रशांत जगताप

265 0

पुणे : गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार व नगरसेवकांनी धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून होत आहेत. येथील स्थानिक नागरिकांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली .

प्रशांत जगताप म्हणाले की, “आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सुरू असलेला प्रकार हा बिहार स्टाईल गुंडगिरीचा प्रकार आहे.निव्वळ कुठल्यातरी बिल्डरला फायदा व्हावा, या हेतूने ही झोपडपट्टी उठवण्याचा ठेकाच भाजपने घेतला असून दररोज त्यांचे नवनवीन प्रताप पाहायला मिळत आहेत. येथील रहिवाश्यांना पुनर्वसन करण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करण्याचा हा सर्व प्रकार आहे. कारण यांना पुन्हा ज्या ठिकाणी पुनर्वसित केले जाणार आहे ती हिल-टॉप भागातील जागा देखील अनधिकृत असून त्या सदनिकांमध्ये स्थलांतर करण्यास स्थानिकांचा विरोध आहे.”

“हा विरोध मोडून काढण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार व नगरसेवकांनी जणू बिल्डरकडून सुपरीच घेतली आहे. दररोज हे आमदार व नगरसेवक येथील नागरिकांना दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देत आहेत,महिलांवर हात उचलत आहे. असे असूनही पोलीस प्रशासन काहीही कारवाई करायला तयार नाही.येथील नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेने बांधून दिलेले शौचालय देखील पडण्याचा प्रयत्न या बिल्डर कडून करण्यात आला आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असल्याचे चित्र पाहायला मिळत नाहीये कारण स्वतः लोकप्रतिनिधी अश्याप्रकारे कायदा हातात घेत आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची याबाबत भूमिका स्पष्ट आहे, सर्वप्रथम या नागरिकांवर सुरू असणारी धाक दडपशाही बंद व्हावी ,या नागरिकांना संरक्षण मिळावे.या नागरिकांचे पुनर्वसन करायचे असल्यास त्यांना विश्वासात घेत अधिकृत जागेत त्यांचे पुनर्वसन करावे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ पुणे पोलिस कमिशनर व पुणे महानगरपालिका आयुक्त यांची सोमवारी भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे .

या प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,प्रमोद गालिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Supriya Sule

Supriya Sule : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

Posted by - September 11, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चर्चा आहे. या शोचा तिसरा सीझन आपल्याला पाहायला…
Udayanraje Bhosale

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Posted by - April 16, 2024 0
सातारा : अखेर भाजपने सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली आहे.भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर…

Pune News : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न

Posted by - March 2, 2024 0
पुणे : श्री रसिकशेठ यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतू…

फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्यास कोर्टाचा नकार

Posted by - December 28, 2022 0
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. या प्रकरणाच्या…

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून यामुळं शिवसेना वर्धापन दिनाअगोदरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिशिर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *