AGNNIVEER : पोलीस , अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

268 0

मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

Share This News

Related Post

Tanaji Sawant

Tanaji Sawant : कळवा रुग्णालयातील18 जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - August 13, 2023 0
पुणे : कळवा रुग्णालयाच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली…
Pankaja-Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

Posted by - July 6, 2023 0
बीड : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याने राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 9…
Ayodhya Pol Patil

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण

Posted by - June 17, 2023 0
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे .ठाणे-कळवामधील मनिषा नगर भागात ही…

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 2 जून रोजी…

महत्त्वाची बातमी ! मुंबईत राज्यपालांच्या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- पडघा येथील वीजकेंद्रात बिघाड झाल्याने दादर, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका राज्यपाल भगतसिंह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *