वाळू ठेकेदार ते साखरसम्राट ; कसा आहे अभिजीत पाटील यांचा प्रवास ?

314 0

पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू झालं आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरू होती.

अशातच अखेर पाटील हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्याशी संबंधित चार कारखान्यांचे आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन तो गेल्यावर्षी यशस्वीपणे चालवून दाखवला होता. त्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कारखान्याची निवडणूक लढवून त्यामध्येही विजय मिळवल्यानं अभिजीत पाटील हे पुन्हा चर्चेत आले होते. पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीतील बड्या घराण्याचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती.

नेमके कोण आहेत अभिजीत पाटील पाहूयात

अभिजित पाटील हे वाळू ठेकेदार होते.

तुकाराम मुंडेंच्या काळात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगात राहावं लागलं.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिजित पाटलांनी ट्रॅक बदलला.

आधी धाराशिव कारखाना, नंतर नांदेड, नाशिकलाही कारखाना चालवायला घेतला.

20 वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.

35 दिवसांतच सांगोला कारखाना त्यांनी रुळावर आणला. यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी त्यांना मागील महिन्यात पसंती दाखवली.

दरम्यान, एक कारखाना चालवणंही अनेक नेत्यांना जमत नसल्याचं आपण पाहतो. शेतकऱ्यांची बिलं तशीच अडकून राहतात.
पण अभिजित पाटलांनी पाच वर्षात पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांनाही खूश केलं होतं. मात्र आता आयकर विभागाने धाड टाकल्यानं आता या धाडसत्रात आयकर विभागाला नेमके काय हाती लागणार आणि काय कारवाई केली जाणार, हे पाहावं लागेल.

Share This News

Related Post

गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

Posted by - December 9, 2022 0
गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या…

मोठी बातमी : जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; 10 मजूर ठार झाल्याची भीती

Posted by - November 1, 2022 0
जालना : महाराष्ट्रातील जालना येथे एक मोठा अपघात झाला आहे. जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळी स्टील वितळणाऱ्या…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बैठकस्थळी पोहचले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्री मांडणार बाजू

Posted by - December 14, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

TOP NEWS MARATHI : आंबेडकरी चळवळीच्या प्रा. अंधारे यांनी शिवबंधन का बांधले ? ‘समोरासमोर’मध्ये प्रा. सुषमा अंधारे (Video)

Posted by - August 1, 2022 0
TOP NEWS MARATHI : फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्राध्यापिका सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना-भाजप…

PDCC बँकेकडून देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 30 लाखांपर्यंत कर्ज मिळणार – अजित पवार

Posted by - August 13, 2022 0
पुणे : देशात महागाई खूप वाढत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *