BJP Leader Udayanraje Bhosale : ” शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला , मग मी म्हणू का पक्ष माझा आहे …! “

197 0

पुणे : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये दीपक केसरकर यांची भेट घेतली . या भेटीमध्ये महाबळेश्वरचा पर्यटन विकास या विषयावर प्रामुख्याने केसरकरांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं . दरम्यान शिवसेना कोणाची या नावावरून सुरू असलेल्या वादंगावर त्यांनी वक्तव्य केला आहे .

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले म्हणाले की , ” शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला , मग मी म्हणू का पक्ष माझा आहे ? अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे . त्यासह मराठा आरक्षणासंदर्भात आधीच्या महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेलं नाही, आता केवळ बोलत आहेत . मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जातीवरून वाद निर्माण हे लोक करत आहेत .

मला विशेष वाटते की, नुसती नाव लावतात पाटील ,जाधव ,महाडिक ,शिर्के ,भोसले केलं का कोणी काही मराठा आरक्षणासाठी ? असा सवाल देखील त्यांनी केला. मी तर जात-पात मानत नाही ,त्याचवेळी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी दिली असती तर प्रश्न मिटला असता.  इकॉनॉमिक बॅकवर्ड सगळ्यांना द्या अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : ‘बर्थ ऑफ अ मदर: रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या पुस्तकाद्वारे इमोशनल हार्मनी प्रशिक्षक शलाका तांबे बनल्या लेखिका

Posted by - March 8, 2024 0
पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून जीवन प्रशिक्षक (लाइफ कोच) शलाका तांबे यांनी पुण्यातील (Pune News) ऑर्किड हॉटेलच्या ग्रँड चेंबर्स…

विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

Posted by - June 20, 2022 0
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे…
Pune News

Murlidhar Mohol : पुढीलवर्षी पुण्यामध्ये अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सवाचे आयोजन – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Posted by - April 19, 2024 0
पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत पुढील वर्षीपासून अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सव आयोजित करण्यात येणार असून, विविध देशांमधील बाल चित्रपट बघण्याची संधी…
Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : गुवाहाटीचा खर्च मी केला; संजय गायकवाडांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Posted by - September 1, 2023 0
बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आमदार आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जोरदार प्रत्युत्तर…
Uddhav Thackeray

Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक खूप चुरशीची होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *