सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा 45 दिवसांवरून 30 दिवसांवर

253 0

नवी दिल्ली : कमीतकमी वेळेत शक्य तितक्या लवकर तक्रारींचा निपटारा करून, तक्रारदाराच्या अधिकाधिक समाधानाच्या अनुषंगाने सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला भर लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली.

नागरिकांकडून आलेली तक्रार, त्याविरुद्ध दाखल केलेले अपील निकाली निघेपर्यंत ती बंद केली जाणार नाही, असे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी ) जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठीची कमाल कालमर्यादा 60 दिवसांवरून 45 दिवसांपर्यंत कमी केली होती, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

लोकांच्या तक्रारींचा निपटारा होऊन त्यांचे अधिकाधिक समाधान व्हावे यासाठी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारतात प्रभावी सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली लागू करण्यासाठी आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, याचा पुनरूच्चार डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. विविध मासिक “प्रगती” (सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी) आढावा बैठकांमध्ये, पंतप्रधान स्वतः सार्वजनिक तक्रारींच्या स्थितीचा आढावा घेतात, असे त्यांनी सांगितले.

लोकांचे समाधान आणि तक्रारींचे वेळेत निराकरण या दोन घटकांमुळे ,2014 मध्ये हे सरकार सत्तेत आल्यापासून सार्वजनिक तक्रारींच्या निराकरणामध्ये दहा पट वाढ झाली आहे आणि यातूनही नागरिकांनी सरकारवर दाखवलेला विश्वास दिसून येतो , असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. 2014 मध्ये निपटारा झालेल्या तक्रारींची संख्या 2 लाख होती सध्या 95 टक्क्यांहून अधिक तक्रारी निकाली काढण्यात येत असून निकाली काढण्यात आलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या 22 लाखांहून अधिक झाली आहे.कल्याणकारी योजनांचे सर्व लाभ कानाकोपऱ्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हा मोदी सरकारचा मुख्य मंत्र आहे, असे ते म्हणाले.

2021 मध्ये तब्बल 30,23,894 तक्रारी प्राप्त झाल्या (त्यापैकी 21,35,923 निकाली काढण्यात आल्या), 2020 मध्ये 33,42,873 तक्रारी प्राप्त झाल्या (23,19,569 निकाली काढण्यात आल्या), आणि 2019 मध्ये 27,11,455 तक्रारी प्राप्त झाल्या (16,39,852 निकाली काढण्यात आल्या), अशी माहिती त्यांनी दिली.

अलीकडेच काढलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, शासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने सर्व विभागांना नोडल तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आणि सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांना पुरेसे सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत.प्राप्त झालेल्या सार्वजनिक तक्रारींच्या संख्येच्या आधारावर, नोडल तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या संपूर्ण देखरेखीखाली आवश्यक तितके तक्रार निवारण अधिकारी ते नियुक्त करू शकतात.

तक्रार बंद केल्यानंतर,नागरिकांना त्यांचा अभिप्राय सादर करता यावा आणि अपील दाखल करता यावे तसेच निवारण केलेल्या तक्रारीचा दर्जा संदर्भात अभिप्राय प्राप्त करण्यासाठी पर्याय असून यासाठी एक बाह्य कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे.

नागरिकांचे तक्रार निवारणासंदर्भात समाधान न झाल्यास त्यांना अपील दाखल करण्याचा पर्याय दिला जाईल आणि कॉल सेंटरद्वारे नागरिकांकडून मिळालेला अभिप्राय जे अभिप्रायांची दखल घेण्यासाठी आणि पद्धतशीर सुधारणा करण्यासाठी उत्तरदायी असलेल्या संबंधित मंत्रालय किंवा विभागांसह सामायिक केला जाईल.

Share This News

Related Post

#PUNE : टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करणार का ? चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना सवाल

Posted by - February 6, 2023 0
पुणे : भाजप कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…

नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Posted by - October 8, 2022 0
मुंबई : नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत…

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’ ; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच…

Breaking News ! कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

Posted by - March 29, 2023 0
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *