अर्थकारण : खासगी नोकरीत पेन्शनची सुविधा नाही… ? स्मार्ट पद्धतीने गुंंतवणूक करून पेन्शनसारखी सुविधा मिळावा

137 0

अर्थकारण : एखाद्या सरकारी खात्यात किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांत कर्मचार्‍यांना पेन्शनची सुविधा नसेल किंवा एखाद्या कर्मचार्‍याने पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेली नसेल तर अशा मंडळींनी चिंता करण्याचे कारण नाही. मुदत ठेवीचा मार्ग हा नियमितपणे पेन्शन मिळवून देण्यासाठी उपयुक्त राहू शकतो. मुदत ठेवीत स्मार्ट पद्धतीने गुंंतवणूक करून पेन्शनसारखी सुविधा मिळवू शकता.

एखादा व्यक्ती कंपनीत नोकरी केल्यानंतर निवृत्त होत असेल आणि त्याला निवृत्ती वेतनाची सुविधा नसेल, त्याने नॅशनल पेन्शन स्किम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीएस) मध्ये गुंतवणूक नसेल तर साहजिकच निवृत्तीनंतर मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक रुपाने कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. या मुद्द्यावरून एखाद्याला ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र या ताणावरून हैराण होण्याची गरज नाही.

म्हणून पेन्शन जरी मिळणार नसेल तरी त्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणजेच ‘नो पेन्शन, नो टेन्शन’. अलीकडच्या काळात व्याजदरात वाढ होत आहे. निवृत्तीच्या वेळी मिळणार्‍या रक्कमेपैकी काही रक्कम मुदत ठेवीत जमा केल्यास खात्यात जमा होणार्‍या रक्कमेच्या आधारे निवृत्तीनंतरचा काळ आरामात जाईल. यानुसार संबंधित पेन्शनरला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.

निवृत्तीनंतर मिळणार्‍या रक्कमेचा योग्य वापर करा : एखादी व्यक्ती निवृत्त होणार असेल आणि कालांतराने निवृत्ती वेतन मिळण्याची कोणतीही संधी नसेल तर निवृत्तीच्या वेळी मिळणार्‍या रक्कमेचा योग्य रितीने वापर करायला हवा. समजा निवृत्तीच्या वेळी 50 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळत असल्यास त्याची योग्य गुंतवणूक करून वार्षिक रुपाने चांगले उत्पन्न मिळवू शकता. यानुसार मूळ रक्कमेला धक्का देखील लागणार नाही.

सुरक्षित गुंतवणूक, हमखास उत्पन्न :

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते आणि ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यांना ही जोखीम नको असेल, त्यांच्यासाठी सध्याच्या काळात मुदत ठेव करणे हा एक चांगला पर्याय राहू शकतो. परंतु लक्षात ठेवा, मुदत ठेवीच्या मॅच्युरिटीचा कालावधी हा एक वर्षापेक्षा अधिक नसावा.

खासगी बँकांकडून जादा व्याजदर : बहुतांश खासगी क्षेत्रातील अनेक प्रमुख बँका सीनियर सिटिझन्स ग्राहकांना एक वर्षाच्या मुदत ठेवीवर सहा ते सात टक्के व्याज देत आहेत. या बँकात स्मॉल फायनान्स बँकांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बँका देखील ज्येष्ठ नागरिकांना सहा ते सात टक्के दराने व्याज देत आहेत.

कसे मिळेल नियमित उत्पन्न : एखाद्या व्यक्तीला प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्यूएटी आणि अन्य भत्ते असे एकत्रितपणे 50 लाख रुपये मिळाले आहेत, असे गृहित धरा. अशा स्थितीत त्या व्यक्तीने एक वर्षाच्या मुदत ठेवीत सात टक्के व्याजदराने पैसे गुंतविले तर त्या हिशोबाने त्याला तब्बल साडेतीन लाख रुपये मिळतील. मूळ रक्कमेला धक्का लागणार नाही. पण मुदत ठेवीच्या मॅच्यूरिटीवर टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने कर भरावा लागेल. म्हणून कर आणि अन्य शुल्कांच्या रुपाने 50 हजार रुपये गृहित धरले तर एक वर्षात निव्वळ तीन लाख रुपये मिळतील.

आता या तीन लाख रुपयांची 12 महिन्यांत विभागणी केली तर दरमहा 25 हजार रुपये मिळतील. हे उत्पन्न अर्थातच समाधानकारक आहे. गेल्या एक दोन वर्षात बँकांची व्याजदर नीचांकी पातळीवर राहिली आहेत. परंतु आता व्याजदरवाढीस सुरवात झाली आहे. परिणामी आगामी काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्षासाठी करण्यात येणारी मुदत ठेवी ही फायदेशीर राहू शकते.

याखेरीज दरमहा मिळणार्‍या 25 हजारांपैकी काही रक्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवत राहिल्यास त्यातूनही चांगला परतावा मिळवता येईल. दरमहा 5 हजार रुपये आपण जमा करत गेलो तर वर्षाकाठी 60 हजार रुपये जमा होतील. यावर साधारणतः 12 टक्क्यांनी परतावा गृहित धरल्यास 6 हजार रुपये मिळतील. अशाच प्रकारे पीपीएफ खात्यात किंवा आरडीमध्येही हा पैसा गुंतवता येईल. थोडक्यात काय तर पेन्शन नाही म्हणून निराश होण्यापेक्षा निवृत्त होताना मिळालेल्या पैशांचे हुशारीने नियोजन करणे गरजेचे आहे.

Share This News

Related Post

Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

Posted by - August 3, 2023 0
पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय…

सोने खरे कि खोटे कसे ओळखावे ? गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनीवारी पुण्यात कार्यशाळा , वाचा सविस्तर

Posted by - September 23, 2022 0
पुणे : गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनिवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर २०२२…
Share Market

Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदाराना झाला मोठा फायदा

Posted by - October 11, 2023 0
भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला.…

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण

Posted by - October 1, 2022 0
नवी दिल्ली : इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर बटण…
Ajit Pawar

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Posted by - February 1, 2024 0
  मुंबई, दि. 1 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *