Decision of Cabinet meeting : राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

163 0

मुंबई : राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल. आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांत जिवीत हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव, दहीहंडी यामधील किरकोळ स्वरुपाचे गुन्हे देखिल मागे घेण्यासंदर्भात समितीने तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांचे 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

Posted by - February 9, 2022 0
राळेगणसिद्धी- राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका…

पुणेकरांनो सावधान : पनीर कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची तिसरी मोठी कारवाई ; २२ लाखाचा साठा जप्त

Posted by - September 13, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर…
eknath Shinde

2024 ला नरेंद्र मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

Posted by - May 25, 2023 0
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या रत्नागिरीच्या (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे…

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 1, 2022 0
बीड : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

राज ठाकरेंच्या आदेशानंतर घाटकोपरमध्ये हनुमान चालिसा सुरू

Posted by - April 3, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदीवरील  बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *