Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढील सुनावणीस शिवसेनेचा आक्षेप ; सर्वोच्च न्यायालयात आज नवी याचिका

142 0

नवी दिल्ली : शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आह़े . निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या वतीने केलेल्या रीट याचिकेशी हा अर्ज संलग्न केला जाणार आहे. हा अर्ज सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होता. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीसाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण सोमवारी संसद भवनात असल्यामुळे हा अर्ज मंगळवारी दाखल केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता व त्यासंबंधित याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई न करता स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार, या मुद्दय़ांवर सुनावणी घेणे योग्य नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या वतीने याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी तसेच, लोकसभेतील १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ही बंडखोरी नसून, आमचा पक्ष खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गट आणि भाजप युती सरकारला शपथही दिली आहे. लोकसभाध्यक्षांनीही १२ खासदारांच्या बहुमताच्या पाठिंब्यावर गटनेता बदलण्यासही मान्यता दिली आणि विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला.

स्थगितीची मागणी

पक्ष संघटनेतील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला दिले आहेत़ मात्र, अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग होतो, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी शिवसेनेची मागणी आह़े

Share This News

Related Post

jitendra-awhad

Jitendra Awhad : ‘एका मांडीवर फुले, शाहू, आंबेडकर तर दुसऱ्या गोळवलकर..’ आव्हाडांनी पुन्हा अजितदादांना डिवचलं

Posted by - December 23, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. शरद पवार गटाचे…

जगदीप धनखर भारताचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली असून एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…
dheeraj-ghate

पुणे शहर भाजपात भाकरी फिरली! धीरज घाटे नवे शहराध्यक्ष

Posted by - July 19, 2023 0
पुणे: आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुळीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे…
BJP

लोकसभेतील महाराष्ट्राचे निकाल….; महायुतीच्या पराभवानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची पोस्ट चर्चेत

Posted by - June 7, 2024 0
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला असून राज्यात भाजपाच्या केवळ नऊ जागा निवडून आले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *