विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बससेवा

101 0

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.

विद्यापीठात सीएनजी बससेवा सुरू करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनुसार ही बससेवा २०१९ या वर्षात सुरू करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्ससिबिलिटी’ अंतर्गत विद्यापीठाला दोन बस उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती. तशी ही बससेवा सुरूही झाली मात्र काही काळातच कोरोना आल्यामुळे ही बससेवा बंद करावी लागली होती. मात्र आता विद्यापीठ परिसर पुन्हा एकदा विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी फुलला असल्याने कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एक बस दर अर्ध्या तासाने परिसरात फेऱ्या करत आहे.

ही बस विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते.

बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय होण्यासोबतच विद्यापीठातील प्रदूषण कमी व्हावे व तेथील अनावश्यक वाहतूक कमी व्हावी यासाठी ही बससेवा आपण सुरू केली आहे. या बससेवेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवश्यकता भासल्यास आणखीही बस विद्यापीठात सुरू केल्या जातील असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितलं

Share This News

Related Post

वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह,महिला भाविकांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या-डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वारीसाठी येणाऱ्या…

Pune News : संकल्प यात्रेच्या नावे मोदींची हमी नव्हे जुमलेबाजी

Posted by - December 15, 2023 0
पुणे : केंद्र सरकारच्या ‘ विकसित भारत संकल्प यात्रा ‘ या अंतर्गत विविध शहरात, गावांमध्ये, मुळातच जुमला म्हणजे फसव्या ,…

चीन मध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात

Posted by - March 21, 2022 0
चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 133 प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला…

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; मोदी सरकारचे नवीन आदेश

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. अशातच आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश…

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Posted by - May 21, 2024 0
छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *