pune police

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

148 0

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी ५ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा राजकीय नेत्यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, जमाव तयार करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा संपूर्ण आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

भाई म्हटलं नाही म्हणून तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावली; पिंपरी चिंचवडमधील घटना

Posted by - January 28, 2022 0
पिंपरी- भाई म्हटलं नाही म्हणून गावगुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला कुत्र्यासारखी बिस्कीट खायला लावून बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना…

महत्वाची बातमी ! चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

Posted by - February 15, 2022 0
नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.…

शरद पवार यांनी दगडूशेठ बाप्पांचे दर्शन घेतले नाही, कारण काय ?

Posted by - May 27, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले.…

उत्तर प्रदेशात भाजप सुसाट!उत्तर प्रदेशच्या विजयावर भाजपाचा पुण्यात जल्लोष 

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी…

#PUNE : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ वाहतूक नियमनाऐवजी वसुली करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Posted by - March 15, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रोजच लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या परिसरात सातत्याने गजबजाट असतोच. अशातच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *