पुणे : 1 कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण , कार्यानुभव आणि नोकरीची संधी

119 0

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी डिजिटल स्किलिंग हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या संदर्भात देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र देण्यात आले आहे. भारताला जगाचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवून डिजिटल स्किलिंग हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एआयसीटीईकडून प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यासाठी तंत्रज्ञान ही मोहीम राबवली जाईल. त्यात विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून प्रशिक्षण, सराव, कार्यप्रशिक्षण, प्रमाणिकरण आणि नोकरी अशी प्रक्रिया असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी कार्यप्रशिक्षण संकेतस्थळ (इंटर्नशिप पोर्टल) विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्या कार्यप्रशिक्षण उपलब्धतेबाबतची नोंदणी करतात. तसेच विद्यार्थ्यांना काम करतानाच प्रशिक्षण देतात.

या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी डिजिटल स्किलिंग उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच डिजिटल स्किलिंग उपक्रमात नोंदणी करून विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालयाकडून 2439 किलो अंमली पदार्थ नष्ट

Posted by - June 9, 2022 0
आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42 हजार 054 किलो पेक्षा…
JOBS

EMRS Recruitment 2023: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘एवढ्या’ जागांसाठी होत आहे भरती; ‘या’ प्रकारे करा अर्ज

Posted by - June 7, 2023 0
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये (Eklavya Model Residential School) मोठ्या प्रमाणात भरती (Recruitment)…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे सर्व पक्षांना आवाहन

Posted by - January 31, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय…
Kasba Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! कसबा गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

महापौर देखील थेट जनतेतून निवडा; वसंत मोरेंचं राज्य सरकारला आव्हान

Posted by - July 8, 2022 0
पुणे: राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणं असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून याच विषयावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *