नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” नामकरण

116 0

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ”असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे.जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

Share This News

Related Post

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

Posted by - April 13, 2022 0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये…

पुण्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

Posted by - July 13, 2022 0
पुणे: पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर,…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…
pune police

Pune News : पुणे पोलिस ॲक्शन मोडवर ! दामिनी पथकं, बीट मार्शलची संख्या वाढवणार

Posted by - June 29, 2023 0
पुणे : प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल (Pune News) खडबडून…
Khandve

पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाधीशांना धमकावल्या प्रकरणी अटक

Posted by - June 4, 2023 0
गडचिरोली : आपल्या विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *