Breaking News

महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

204 0

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तरप्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

Share This News

Related Post

Maharashtra Highway

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Posted by - April 20, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम…
car Accsident

देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

Posted by - May 6, 2023 0
सांगली : सध्या राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगलीमध्ये असाच एक भीषण अपघात झाला आहे.…

पंढरपुरात माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास (व्हिडिओ)

Posted by - February 12, 2022 0
पंढरपूर- आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली असून पंढरपुरात जवळपास…
Nagpur News

Nagpur News : FB लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन; ‘ती’ तरुणी ठरली कारण

Posted by - September 13, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात…
Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मदत; अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

Posted by - July 24, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *