Mental Health : न्यूनगंड म्हणजे नक्की काय ?’अशी’ करा तुमच्यातील न्यूनगंडावर मात,नक्कीच वाढेल आत्मविश्वास…

242 0

Mental Health : आपण इतरांपेक्षा कमी आहोत,आपल्याला काहीच जमत नाही किंवा आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होणं म्हणजे न्यूनगंड.आजच्या धावत्या युगात प्रत्येकाचं पाऊल हे जलद गतीने पडताना दिसत आहे.प्रत्येक गोष्ट ही कमी वेळात आणि अतिशय चोखपणे पार पाडायची क्षमता जवळ जवळ सर्वांमध्ये दिसून येते. पण काही लोकं असेही असतात ज्यांना आपण हे करू शकु की नाही यावर मनामध्ये प्रश्न असतात.

हे निर्माण झालेले प्रश्न नकारात्मक गोष्टींना प्राधान्य देतात आणि मग आपल्याया हे शक्य नाही या निष्कर्षापर्यंत अगोदरच पोचतात.ही भावना सतत मनात निर्माण होणं म्हणजेच न्यूनगंड असणे होय.न्युनगंड साधारणतः मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळुन येतो.आजकाल मुलांवर प्रत्येक क्षेत्रांत खुप व्याप आहे. मग तो खेळ असो किंवा डान्स,अभ्यास असो किंवा अजुन कोणत्या वेग-वेगळ्या स्पर्धा. यामध्ये काही मुलं खुप चांगली कामगिरी करतात. पण काही मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते.बाहेर शाळेंमधून शिक्षकांच्या वेगळ्या अपेक्षा,तर घरी आईवडिलांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. त्यामुळं काही मुलं ताण घेतात व त्यांचा असलेला आत्मविश्वाससुद्दा खचला जातो.परीणामी मुलं न्युनगंडची शिकार बनतात.
तसेच मोठ्या माणसांमध्येही न्युनगंड दिसुन येतो. बऱ्याच वेळेला नवीन काही काम चालु करायचं असेल तर लोकं काय म्हणतील असे प्रश्न निर्माण होतात. व त्यांच्या मनातही कमीपणाची भावना निर्माण होते.एका व्यक्तीची सतत दुसऱ्या व्यक्तीबरोबर होणारी तुलना आणि त्यातुन निर्माण होणारी अविश्वासाची भावना न्युनगंड निर्माण करते.

अशी करा न्युनगंडावर मात

१. न्युनगंडावर मात करायची असेल तर सर्वप्रथम मनातील भीती काढुन टाका

२. स्वतःतील ज्या उणिवा आहेत त्यावर काम काम करा.

३. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना नेहमी यश येईलच असे नाही,पण यश मिळणारच नाही ही भावना मनातुन काढुन टाका.

४. स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखु नका.ज्याप्रमाणे हातांची सगळी बोटं सारखी नसतात,त्याप्रमाणं सगळी माणसं सुद्दा सारखी नसतात.आपले कौशल्य कशात आहे हे ओळखा आणि त्यावर काम करा.

५. तुमच्या मनात जे आहे ते बोलायला शिका, त्यामुळं आत्मविश्वास वाढेल.

या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर न्युनगंडावर नक्की मात करू शकता.हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला सिमेंट करून नक्की कळवा.

Share This News

Related Post

Health Tips

Health Tips : झोपेतून उठल्यावर चक्कर येतेय? तर वेळीच सावध व्हा; नाहीतर होऊ शकतात ‘हे’ आजार

Posted by - August 24, 2023 0
आजची लाइफस्टाइल आणि धकाधकीच्या आयुष्यात माणसाला अनेक आजारांचा (Health Tips) सामना करावा लागतो. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणे…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यास चांगले, पण…..

Posted by - June 24, 2022 0
पाणी ही शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. शिवाय हे पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास त्याचा शरीराल खूप फायदा होतो हे सिद्ध झाले…

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

Posted by - January 25, 2023 0
एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील…

Before And After Pregnancy : Stretch Mark पडले आहेत ? अशी घ्या काळजी …

Posted by - August 26, 2022 0
बाळंतपण म्हटलं की अंतर्गत शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात . त्या नऊ महिन्यांमध्ये प्रत्येक दिवस होणाऱ्या आईसमोर नवीन समस्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *