पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

195 0

महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि ग्यानबा, तुकारामचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरात दाखल होतो. आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्याची देखील परंपरा आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा होणार आहे. पण विठ्ठलाची ही शासकीय महापूजा करण्याला एकदा विरोध केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रावर फार मोठं संकट आलं. तेव्हापासून ही पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायला सुरुवात झाली.

असा आहे महापुजेचा इतिहास 

पेशव्यांच्या काळात पंढरपूरच्या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. या समितीच्या सदस्यांकडून आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा होत असे. पेशवाईनंतर इंग्रजांच्या काळात हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षाकाठी दोन हजार रुपयांचे अनुदान देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपूरात आले, त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.

पण, 1970 मध्ये काही लोकांनी निधर्मी राज्यात सरकारने शासकीय पूजा करणे योग्य नसल्याचे सांगत आंदोलन केले. त्यामुळे 1971 साली विठ्ठलाची शासकीय पूजा झाली नाही. पण 1972 मध्ये राज्यात भीषण असा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये राज्यातील शेतकरी आणि जनतेची अवस्था हवालदिल झाली. त्यामुळे सरकारने पूजा बंद केली म्हणून विठ्ठल कोपला आणि राज्यात दुष्काळ पडला, अशी भावना सर्वसामांन्यांत आणि वारक-यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1973 स्वतः पंढरपूरच्या विठोबाची महापूजा करत राज्यावरील संकट दूर करण्यासाठी साकडे घातले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा करण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा स्वतः मनोहर जोशींनी दिंडीत सामील होत सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यामुळे वारीत स्वतः सहभागी झालेले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना या पूजेचा पहिला मान मिळाला.

Share This News

Related Post

Municipal elections : अखेर 4 सदस्यांचाचं प्रभाग निश्चित ; 2017 प्रमाणे होणार निवडणूक (VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
Municipal elections : पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आता 2017 नुसारच…

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

Posted by - January 17, 2023 0
पुणे : जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - December 31, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणाऱ्या एका…

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड, शिवसेनेचे तोडफोड केल्याचा भाजपचा आरोप

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान पोलखोल रथ तयार करण्यात…

भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी केलं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Posted by - March 15, 2022 0
भाजप खासदार हेमा मालिनी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माध्यमांशी बोलताना भाजप खासदार म्हणाले की, इतर संस्था…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *